सातारा

सेनेचे शंभूराज करणार का जयंत पाटलांची इच्छापूर्ती?

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : मुसळधार पावसासाठी प्रति चेरापुंजी या नावाने प्रसिध्द असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडणारा पाऊस राज्यातील जनतेला शेती व विजेसाठी हवाहवासा वाटतो. हा संततधार पाऊस अनेकांचे लक्ष वेधून घेत असतो. याचाच प्रत्यय मंगळवारी (ता. १८) कोयनावासियांना आला. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई या मंत्र्यांनी कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पडणा-या पावसाचा मनमुराद भिजून आनंद लुटला. दरम्यान, लाखो लोकांच्या जिभेचे चोचले पुरवून विक-पॉईंट झालेल्या कोयना धरणातील टेस्टी मासे खायला बोलवा, अशी मिश्कील मागणी जलसंपदामंत्री पाटील यांनी मंत्री शंभूराज यांच्याकडे हक्काने केली.

देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेरापुंजीला मागे टाकण्याचे काम पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्राने केले आहे. कोयना, नवजा व महाबळेश्वर या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचे माहेरघर ठरविण्यासाठी जणू स्पर्धाच लागलेली असते. या ठिकाणी पडणारा पाऊस जनतेला हवाहवासा वाटतो. याची प्रचितीच कोयना धरणाच्या पाहणी दौऱ्यावर आलेल्या जलसंपदामंत्री जयंत पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना आली.

कोयना परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणात मंगळवारी 92 टीएमसी पाणीसाठा असून मुसळधार पावसाने धरणात येणारे पाणी धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडून नदीपात्रात सोडण्यात आले. जलसंपदामंत्री पाटील व गृहराज्यमंत्री देसाई यांनी मंगळवारी कोयना धरणाला भेट दिली. दरम्यान, यावेळी कोयना परिसरात मुसळधार पाऊस सुरु होता. या पावसात मनसोक्त भिजण्याची इच्छा जलसंपदामंत्री पाटील व गृहराज्यमंत्री देसाई यांना झाली आणि ती त्यांनी नुकतीच पूर्णही केली. कोयना धरणातील मासे अतिशय टेस्टी असतात. शंभूराजे, मासे खायला एकदा आवर्जून बोलवा, असे त्यांनी हक्कांनी देसाई यांना सांगितले.

संपादन - बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 5th T20I: पाऊस थांबला, ९ वाजता टॉस, साडे नऊ वाजता मॅच सुरू होणार; वाचा किती षटकांचा सामना रंगणार

Congress Mega Rally : अखेर दिल्ली पोलिसांची काँग्रेसला 'एनओसी'; ऐतिहासिक रामलीला मैदानावर ज्ञानेश कुमारांविरोधात एल्गार, 'ही' आहे तारीख!

चार वर्षांनंतर भारतात होणार IPL लिलाव? तारीख ठरली, पण त्याच दिवशी IND vs SL सामना... सावळागोंधळ

Hormuz Closed: होर्मुझची सामुद्रधुनी बंद; मोठी दुर्घटना; भारताला फटका बसणार का?

Latest Marathi News Live Update : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : महसूलमंत्री बावनकुळे

SCROLL FOR NEXT